पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाच्या १४ रुग्णांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक: आरोग्यमंत्री

आरोग्य मंत्री राजेश टोपे

झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये भितीचे सावट आहे. अशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. 'राज्यातील एका वयोवृध्द रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतर सर्व रुग्णांची प्रकृती चांगली आहे.', अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर शाळांच्या सुट्टीबाबत लवकरच निर्णय घेऊ असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना विषाणूसंदर्भात एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

 

कोरोनामुळे देशापुढे मोठे संकट, पण सरकार गुंगीतच; राहुल गांधींची टीका

कोरोना विषाणूमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी एकत्र येत कोरोनाशी लढा देऊ, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. तसंच, घाबरु नका, सतर्क रहा आणि सरकारला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचे १४ रुग्ण आढळले आहे. पुण्यामध्ये ९, मुंबईत ३, नागपूरमध्ये १ आणि ठाण्यामध्ये १ कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.

हत्येप्रकरणी कुलदीपसिंह सेनगरला १० वर्षांची शिक्षा

दरम्यान, जर कोरोनाशी संबंधित लक्षणं आढळली तर त्वरीत डॉक्टरांकडे जा. वैयक्तीक स्वच्छता पाळा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. तसंच, परदेशातून आलेल्या नागरिकांशी संपर्क टाळा. सरसकट कोरोनाची टेस्ट करण्याचा आग्रह नको, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. कोरोनाशी लढण्यासाठी राज्यसरकार सतर्क असून रुग्णांची टेस्ट मोफत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

कोरोनामुळे १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय