पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लॉकडाऊन १५ तारखेनंतर शिथील होईल असं गृहीत धरु नका'

आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लागू केलेला लॉकडाऊन कधी संपेल असे नागरिकांना झाले आहे. मात्र १५ एप्रिलनंतर लॉकडाऊन १०० टक्के शिथील होईल असे कुणीही गृहीत धरु नये, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. १० ते १५ एप्रिलपर्यंत असलेल्या परिस्थितीवर लॉकडाऊनची पुढील दिशा अवलंबून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील ८७% कोरोनाबाधित रुग्ण मुंबई-पुण्यात

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. या लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, प्रवास आणि गर्दी टाळावी, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. हा लॉकडाऊन कधी संपेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात १५ तारखेनंतर लॉकडाऊन १०० टक्के शिथील होईल, असं कुणीही गृहीत धरु नये, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक देशांतील परिस्थितीचा अभ्यास करून लॉकडाऊन कसा शिथील करता येईल यावर अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूत

महाराष्ट्रातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असून ती पाच टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जाऊ शकतो. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८६८ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

औषधांचा पुरवठा न केल्यास भारताला जशास तसे उत्तर देऊ: ट्रम्प

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:health minister rajesh tope says dont assume the lockdown will subside after the 15th april