पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हर्षवर्धन जाधव यांची घरवापसी; राज ठाकरेंच्या उपस्थितीत 'मनसे'प्रवेश

हर्षवर्धन जाधव पुन्हा मनसेत

कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी घरवापसी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दादर येथील कृष्णकुंजवर त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. 

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात; ७ जण ठार

मनसेमध्ये आज मेगाभरती झाली आहे. हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासोबत औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या जवळचे सहकारी आणि शिवसेना लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनी देखील मनसेत प्रवेश केला. 

कुठलाही हेतू मनात ठेवून इथं आलो नाही : शरद पवार

हर्षवर्धन जाधव यांनी १८ जानेवारीला राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन हे मनसेचे आमदार होते. मनसेच्या पहिल्या १३ आमदारांपैकी ते एक आहेत. नंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेकडून ते आमदारही झाले होते. 

हिंगणघाट प्रकरण: आरोपी विकेशची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मराठा आंदोलनावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनाला रामराम ठोकला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात औरंगाबाद मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला होता. 

संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट