पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वे

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सीएसएमटी-वडाळा दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती.  रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम करण्यात आले. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून वाहतूक सुरु झाली आहे मात्र या मार्गावर गाड्या उशिराने धावत आहेत.

 

निवडणूक भरारी पथकाने कारमधून ४ कोटी केले जप्त

हार्बर मार्गावरील शिवडी रेल्वे स्थानकाजवळ पहाटे ५ वाजता ओव्हर हेड वायर तुटली होती. त्यामुळे सीएसएमटी-वडाळा लोकलसेवा ठप्प झाली होती. मात्र वडाळा-पनवेल आणि वडाळा गोरेगाव ही लोकलसेवा सुरु होती. दरम्यान रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. दुरुस्तीचे काम सकाळी ७.५० वाजता पूर्ण झाले. हार्बर मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. 

येत्या ४८ तासात राज्यात मेघगर्जनांसह जोरदार पावसाची शक्यता