पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलग दुसऱ्या दिवशी हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत

मध्य रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

हार्बर रेल्वे मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत झाली आहे. चेंबूर ते टिळकनगर रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. कामावर जाण्याच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ऑफिसकरांना लेट मार्कचा सामना करवा लागणार आहे.

 

 

अयोध्या खटला : मध्यस्थ समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश

रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. रेल्वे रुळाच्या दुरुस्तिचे काम युध्द पातळीवर करण्यात आले. मात्र रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे हार्बर मार्गावरील वेळापत्रक कोलमडले. सीएसएमटी स्थानकाकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरु असल्यामुळे सर्व रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली. त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. दुरुस्तीचे काम झाले तरी वाहतूक उशिराने सुरु आहे ती पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे. 

वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्यावर घरांवर सीबीआयचे छापे