मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टाने दिलेला निकाल न्यायालयीक शिस्तभंग करणारा असल्याचे मत मराठा आरक्षणासंदर्भात विरोधी याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी म्हटले आहे. मुंबई न्यायालयाने दिलेला निकाल हा असंविधानिक असून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली. याशिवाय त्यांनी राज्य सरकारचा कोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप असल्याचा आरोपही केला आहे.
मराठा आरक्षण : महत्त्वाची लढाई आपण जिंकलो - मुख्यमंत्री
न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने आज आरक्षणासंदर्भातील निकाल दिला. त्यांनी आरक्षणाच्या विरोधातील चार याचिका फेटाळून राज्य सरकारला आरक्षणाचा अधिकार असल्याचे म्हटले होते. या निकालानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.