पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका; सरपंच निवडीचा अध्यादेश फेटाळला

राज्यपाल आणि मुख्यमंत्री

जनतेमधून थेट सरपंच निवड करण्याचा तत्कालीन फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करुन ठाकरे सरकारने ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचांची निवड केली जावी असा निर्णय घेतला होता. याबाबत ठाकरे सरकारने अध्यादेश काढला होता. मात्र हा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला दणका बसला आहे.  

मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर; मोदींसह 'या' दिग्गजांची घेणार भेट

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महाराष्ट्रात आलेल्या ठाकरे सरकारने त्यांचा निर्णय रद्द करत जुन्या पध्दतीनुसार म्हणजेच ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेतला. याबाबत सरकारने अध्यादेश सुध्दा काढला. मात्र या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली आहे. 

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या तरुणीविरोधात

फडणवीस सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय ठाकरे सरकार रद्द करण्याच्या तयारीत होती. मात्र राज्यपालांनी ठाकरे सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानाद्वारेच सरपंच निवडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने २८ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानुसार ठाकरे सरकारने अध्यादेश काढला आणि राज्यपालांना स्वाक्षरी करण्यास विनंती करण्यात आली होती. मात्र राज्यपालांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. 

बारावी गुणपत्रिकेवरील 'अनुत्तीर्ण' शेरा होणार गायब

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:governor bhagatsinh koshyari rejects thackeray government refusal release sarpanch election proposal