पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Independence Day: मुंबईसह देशभरात कडेकोट बंदोबस्त

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनलवर देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

देशभरात ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. स्वातंत्र्य दिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देशभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील प्रमुख शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असून संशयित वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. भारत सरकारच्या या निर्णयानंतर दहशतवादी स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर देशभरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील प्रमुख शहरांसह मुंबईत देखील अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ यासारख्या गर्दीच्या ठिकाणांची पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त दिसून येत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Government Railway Police and Railway Protection Force conduct security check at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus ahead of Independence Day