पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने मिळणार: सरकारचा निर्णय

पुरंदर किल्ला

राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे. हे ऐतिहासिक गडकिल्ले लग्न समारंभ आणि हॉटेलिंगसाठी भाड्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ऐतिहासिक पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासाठी एमटीडीसीने राज्यातील २५ किल्ल्यांची निवड केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोधत करत अनेकांनी जोरदार टीका केली आहे. 

काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना पुन्हा तिकीट देण्याच्या तयारीत

राज्य मंत्रिमंडळाने ३ सप्टेंबर रोजी गडकिल्ल्याबाबतच्या या निर्णयाला मान्यता दिली. या गडकिल्ल्यांचा वापर लग्न समारंभ, करमणुकीचे कार्यक्रम, हॉटेलिंग, डेस्टिनेशन वेडिंग यासाठी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एमटीडीसीने राज्यातील २५ गडकिल्ल्याची निवड केली आहे. हे किल्ले ५० ते ६० वर्ष भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ३३५ किल्ले आहेत त्यापैकी १०० किल्ल्यांची संरक्षित वास्तू म्हणून नोंद करण्यात आली आहे. राजस्थान, गोवा राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

UAPA तील सुधारणांविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात

दरम्यान, सरकारने गडकिल्ल्यांबात घेतलेल्या या निर्णयामुळे गडप्रेमी नाराज झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून गडप्रेमींनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत जोरदार विरोध केला आहे. त्याचसोबत विरोधकांनी देखील सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे. विकास हवा पण गडकोटांचं पावित्र्य राखूनच असे विरोधकांनी म्हटले आहे. 

विधानसभा २०१९: गणपतराव देशमुख; वय ९३ वर्षे, उपस्थिती ९४