पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोएअरची १८ विमाने सोमवारी रद्द, विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले

गोएअर विमान कंपनी

विमाने आणि कर्मचारीच उपलब्ध नसल्याने गोएअरने सोमवारी तब्बल १८ विमाने ऐनवेळी रद्द केली. यामुळे हजारो प्रवासी वेगवेगळ्या विमानतळावर अडकून पडले होते. मुंबईतून उड्डाण करणारी सर्वाधिक विमाने रद्द करण्यात आली. त्याखालोखाल नवी दिल्लीतून उड्डाण करणारी विमाने रद्द करण्यात आली.

स्वस्तात विमान प्रवासासाठी इंडिगोची धमाकेदार ऑफर

रद्द केलेल्या विमानांमध्ये मुंबई-गोवा, गोवा-मुंबई, मुंबई-बंगळुरू, बंगळुरू-मुंबई, दिल्ली-बंगळुरू, बंगळुरू-दिल्ली, मुंबई-चंदीगढ, चंदीगढ-मुंबई, दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, पाटणा-बंगळुरू, कोलकाता-इंदूर, इंदूर-कोलकाता या मार्गावरील फेऱ्यांचा समावेश आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडे सध्या विमान कमी उपलब्ध आहेत. कंपनीच्या ताफ्यातील एअरबस ए३२० निओ विमाने तांत्रिक कारणामुळे उड्डाण करू शकत नाही. गोएअरची विमाने सध्या विलंबाने उड्डाण करीत आहेत. त्यामुळे विमाने पुढील विमानतळावर पोहोचण्यासही उशीर होतो आहे. 

'महाराष्ट्रानंतर झारखंडही गमावलं, भाजपला आत्मचिंतनाची गरज'

गोएअरच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानसेवा विस्कळीत होण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यामध्ये हवामान, दिल्लीतील कमी दृश्यमानता, नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन यामुळे गोएअरच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत.