पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईकरांचे वर्षातील ८ दिवस १७ तास ट्रॅफिक जॅममध्येच...

मुंबई पाऊस

मुंबईकरांचे वर्षातील सरासरी ८ दिवस १७ तास किंवा एकूण २०९ तास वाहतूक कोंडीत (ट्रॅफिक जॅम) जात असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह देशातील मोठ्या शहरांतील वाहतूक कोंडी हा गंभीर विषय झाला आहे. वाहतूक कोंडीचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या जगातील शहरांच्या यादीमध्ये मुंबईचा चौथा क्रमांक लागला आहे. मुंबईत वाहनचालकांना गर्दीच्यावेळी ६५ टक्के जास्त वेळ वाहतूक कोंडीत घालवावा लागतो, असेही अहवालातून पुढे आले आहे. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स २०१९ मधून ही माहिती पुढे आली.

इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड

मुंबई सध्या एकूण ८ मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. त्याचवेळी रस्त्यांचे आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे कामही वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने सुरू असते. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. रस्ता रिकामा असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ आणि गर्दीच्या वेळी त्याच रस्त्यावरून जाण्यासाठी लागणारा वेळ यामध्ये जो फरक असतो यावरून वाहनचालकांचा किती वेळ वाया जातो, याची आकडेवारी काढली जाते. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स २०१९ च्या अहवालानुसार मुंबईत शुक्रवारी संध्याकाळी सात ते आठ या वेळेत प्रवास करणे सर्वाधिक भीषण आहे. या दिवशी या वेळेत वाहतूक कोंडीचे प्रमाण शहरात ५२ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचलेले असते.

भीमा-कोरेगाव तपास : सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची राज्याकडून चाचपणी

टॉमटॉम इंडियाचे व्यवस्थापक विनोदकुमार पी म्हणाले, वाहनांची वाढती संख्या, मुसळधार पाऊस आणि विविध विकासकामे यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त आहे. या अहवालातील आकडेवारीवरून आणि निष्कर्षांवरून वाहनचालकांना आपले नियोजन करणे शक्य होईल. म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत जर खूप वाहतूक कोंडी असते, हे वाहनचालकांना कळले तर त्यांना त्या वेळेत आपल्या गाड्या घेऊन रस्त्यावर येणे टाळता येईल.