पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंबिवली: गर्दीमुळे लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

मुंबईमध्ये लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवली-कोपर स्थानका दरम्यान जलद लोकलमधून तरुणी पडली. सकाळी ९.२० वाजता ही घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चार्मी शांतिलाल पासड (२२ वर्ष) असं मृत तरुणीचे नाव आहे. 

उन्नाव बलात्कारः भाजपचा निलबिंत आमदार कुलदीप सेंगर दोषी

चार्मीने नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी डोंबिवली येथून सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल पकडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे चार्मीला आतमध्ये जाता आले नाही. अशातच तोल जाऊन ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाली. चार्मीच्या पाठीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेत तिला डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. 

सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली: फडणवीस

चार्मी डोंबिवलीतील कोपरगाव येथील नवनित नगरमध्ये कुटुंबियांसोबत राहत होती. ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली असता ही घटना घडली. चार्मीचा मृत्यू झाल्यामुळे पासड कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.