पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गर्दीचा आणखी एक बळी; धावत्या लोकलमधून तरुणी पडली

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

मुंबईतील लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच गर्दीचा आणखी एक बळी गेला आहे. धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू झाला आहे. कोपर- दिवा स्थानकादरम्यान जलद लोकलमधून तरुणी पडली. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सविता नाईक (३० वर्ष) असं या तरुणीचे नाव असून ती डोंबिवली पूर्वेतील सांगरली येथे राहत होती. या दुर्घटनेनंतर जीआरपीएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. 

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता नाईकने आज नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी डोंबिवलीवरुन सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल पकडली. मात्र लोकलमध्ये आधीच खूप गर्दी असल्यामुळे ती लोकलच्या दरवाज्यावरच उभी राहिली. लोकलमधील गर्दीमुळे सविताचा कोपर - दिवा स्थानका दरम्यान तोल गेला आणि ती खाली पडली. सविताचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सविताचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. दरम्यान, तिच्या कुटुंबियांना अपघाताबाबची माहिती देण्यात आली आहे.