पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गिरीश महाजनांना फोडाफोडीचे अतिरिक्त खाते द्याः धनंजय मुंडे

गिरीश महाजन आणि धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून एक खाते वाढवायला हवे होते. विरोधी पक्षाच्या आमदारांना फोन करून फोडाफोडी करण्यातच यांचा वेळ जातो. त्यामुळे फोडाफोडीचे अतिरिक्त खाते गिरीश महाजन यांच्याकडे द्यायला हवे, असा टोला त्यांनी लगावला. विधीमंडळ अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला काँग्रेसबरोबरील संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली. 

राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर रविवारी पार पडला. नव्या १३ जणांना मंत्रिपदाची शपथ देताना विद्यमान ६ जणांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा लागला. यावरुनही त्यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. आज राज्य मंत्रिमंडळ विस्तारात याआधीच्या ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. खरंतर भ्रष्टाचारात माखलेल्या दीड डझन मंत्र्यांना काढायला हवे होते. १२०० कोटींच्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळातून वगळून काही होणार नाही. त्यांच्यावर त्वरीत कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती- धनंजय मुंडे

ते म्हणाले, सोमवारपासून जागतिक दुष्काळविरोधी दिनी अधिवेशनाची सुरूवात होणार. मात्र दुर्दैवाने दुष्काळाच्या झळा राज्यातील जनतेच्या चुलीपर्यंत पोहोचल्यात. दुष्काळात आम्ही सर्वत्र फिरलो, मात्र मुख्यमंत्री महोदयांनी एसीमध्ये बसून आढावा घेतला. अन् शिवसेना प्रमुखांना विदेशवारी नंतर शेतकऱ्यांची आठवण आली.

मोदींच्या शौर्याची दखल गिनीज बुकने घ्यावी, धनंजय मुंडेंचा टोला

दुष्काळ समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा फक्त आभास निर्माण केला. पावसाळी अधिवेशनात पेरणीसाठी २५ हजार रूपये, सरसकट कर्जमाफी, वीज बिल माफी या मुद्यांवर सरकारला धारेवर धरणार आहोत. 

वायफळ बोलण्यापेक्षा मौनात ताकद, राऊत यांचे मोदींना समर्थन

धनगर आरक्षणाचा आभास निवडणुकांपूर्वी निर्माण केला गेला. त्यांना गेल्या पाच वर्षात आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षणाचा गुंताही अद्याप आहे. मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने सरकारवर सातत्याने न्यायालय ताशेरे ओढत आहे. तरीसुद्धा सरकार ढिम्मच आहे, असेही त्यांनी म्हटले.

'इडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव यांचा औरंगजेबास मुजरा'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:girish mahajan should give to split opposition department in cabinet expansion says dhananjay munde