पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शालिमार एक्स्प्रेसः जिलेटिन कांड्यांसोबत भाजप सरकारविरोधात पत्र

जिलेटिन कांड्यांसोबत भाजप सरकारविरोधात पत्र (ANI)

पश्चिम बंगालमधून लोकमान्य टर्मिनसला आलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हावडा येथून आलेल्या एक्स्प्रेसची सफाई करताना जिलेटिनच्या पाच कांड्या आढळून आल्या. रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लगेचच लोकमान्य टर्मिनस रिकामे केले आहे. स्टेशन परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली आहे. दरम्यान, जिलेटिनबरोबर एक पत्रही मिळाले असून त्यात भाजप सरकारला धडा शिकवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे घातपाताचा कट उधळला आहे. पोलिस याबाबत कसून शोध घेत आहेत.

... तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाचा वेळही कमी होणार

हावडा येथून आलेली शालिमार एक्स्प्रेस ही आपल्या शेवटच्या स्थानकावर (लोकमान्य टर्मिनस) सकाळी साडेआठच्या सुमारास आली. त्यानंतर सर्व प्रवासी उतरल्यानंतर ती साडेनऊच्या सुमारास स्वच्छतेसाठी यार्डात गेली. त्यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना एक बोगीत ५ जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. या जिलेटिनबरोबर एक पत्र ही सापडले आहे. पत्रात सांकेतिक भाषेतही काही मजकूर होता. भाजपला आम्ही काय करु शकतो हे दाखवण्याची वेळ आली आहे, असेही या पत्रात लिहिले आहे. त्याचबरोबर हे पाकीट आहे तिथेच सोडून जा. दुसरी टीम येऊन ते घेऊन जाईन, असे त्यात म्हटले आहे. या पाकिटाबरोबर बॅटरीही आढळून आली आहे. 

सुरक्षेसाठी लोकमान्य टर्मिनस त्वरीत रिकामे करण्यात आले. ईदच्या दिवशीच ही स्फोटके आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षादलांकडून चौकशी केली जात आहे. 

मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक लोकलचा प्लॅन बारगळला