पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठला हृदयविकाराचा झटका, प्रकृती अत्यंत नाजूक

 गहना वशिष्ठची प्रकृती नाजूक

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री गहना वशिष्ठला  हृदयविकाराचा झटका आला आहे. ३१ वर्षीय गहना मालाडच्या रुग्णालयात असून तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गहना योग्य आहार न घेता आणि आराम न करता गेल्या ४८ तासांपासून चित्रीकरण करत होती अशीही माहिती समजत आहे.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार टिकणार नाही: गडकरी

प्रमाणाबाहेर औषधं, एनर्जी ड्रिंक्स आणि योग्य आहार न घेतल्यानं त्याचा विपरित परिणाम गहनाच्या प्रकृतीवर झाला असून त्यातूनच तिला हृदय विकाराचा झटका आल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. 

गहना उपचारांना योग्य प्रतिसाद देत नाहीये. तिला श्वास घेण्यासाठीही त्रास होत आहे. तिला व्हेंटिलेटरवर  ठेवण्यात आले  आहे. तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे आहे, अशी माहिती रक्षा रुग्णालयाचे डॉ. प्रणव काब्रा यांनी दिली. 

केईएममधील प्रिन्सची मृत्यूशी झुंज अपयशी

गहना ही नुकतीच अल्ट बालाजीच्या 'गंदी बात'मध्ये दिसली होती. ती एका वेबसीरिजसाठी चित्रीकरण करत होती.