पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गँगस्टर एजाज लकडावालाच्या पोलिस कोठडीत २७ जानेवारीपर्यंत वाढ

एजाज लकडावाला

कुख्यात गुंड एजाज लकडावाला याला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंधेरीतल्या व्यापाऱ्याला धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी एजाजला अटक करण्यात आली होती. आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याची रवानगी पोलिस कोठडीमध्ये केली आहे. 

'...हा भाजप आणि संघ परिवाराला बदनामीचा कट'

९ जानेवारीला पाटणा विमानतळावरून एजाजला अटक करण्यात आली होती. लकडावालाविरोधात खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. एजाज लकडावाला परदेशात राहून भारतात खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत होता. देशातील अनेक व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचे काम त्याच्या टोळीकडून केले जात होते.

मुंबईतील 'नाईट लाईफ'ला मंत्रिमंडळाची मंजुरी, अशी होणार

एजाजला अटकेनंतर कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज कोर्टाने त्याच्या कोठडीत २७ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. एजाज लकडवालाविरोधात आतापर्यंत एकूण २५ गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांचा जवळचा म्हणून एजाज लकडावाला ओळखला जातो.

नाईट लाईफ नसून ही किलिंग नाईट; आशिष शेलारांचे टीकास्त्र