पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! मुंबईत प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक

पतीच्या समोरच या नराधमांनी पीडितेवर सामुहिक बलात्कार

मुंबईमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.  

प्रियांका गांधींच्या सक्रीय राजकारणाचे एक वर्ष आणि सहा मुद्दे

पीडित महिला सोमवारी रात्री ११ वाजता कुर्ला रेल्वे स्थानकावर उतरुन मध्य प्रदेश येथे जाणारी रेल्वे पकडण्यासाठी ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात होता. साबळेनगर येथील झाडीमध्ये पीडित महिला लघुशंकेसाठी गेली होती. त्याच दरम्यान, चारही आरोपी तिला अज्ञातस्थळी खेचून घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसंच, पीडित महिलेकडे असलेले ३ हजार रुपये आणि दागिणे घेऊन फरार झाले.

... हे आहेत प्रजासत्ताक दिन संचलनासाठी यंदाचे प्रमुख पाहुणे

दरम्यान, पीडित महिलेने रस्त्यावर येऊन एका महिलेकडे मदत मागितली आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन आरोपींना अटक केली. तर उर्वरित दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. चारही आरोपींविरुध्द नेहरुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी सुरु आहे.  सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. 

'सदस्यत्व रद्द करण्याच्या अध्यक्षांच्या अधिकाराचा फेरविचार करावा'