पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक कोंडी,कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचा खोळंबा

मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचा खोळंबा

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. महाड (जि. रायगड) जवळील वडपाले गावाजवळ एका एसटीला आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या आनंदात निघालेल्या गणेशभक्तांचा मोठा खोळंबा झाला आहे. दरम्यान, अनेक तास रखडलेली वाहतूक एका बाजूने सुरु झाली आहे.

गणेशभक्तांची गर्दी पाहता तुतारी एक्स्प्रेसचे ३ डबे वाढवले

वडपाले गावाजवळ कोकणात जाणाऱ्या एका एसटीला अचानक आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्याही तितकीच मोठी आहे. वाहनांच्या सुमारे २ ते ३ किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या. 

आर. के. स्टुडिओ विकला, आता गणेशोत्सव नाही'

या वाहतूक कोंडीमुळे पहाटे कोकणाकडे निघालेले चाकरमानी अडकून पडले आहेत. हा त्रास रस्ते मार्गाने नव्हे तर रेल्वेने निघालेल्या चाकरमान्यांनाही होत आहे. कोकण रेल्वेवरील महत्वाच्या गाड्या १ ते २ तास उशिराने धावत आहेत. कोकण परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.