पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

लालबागचा राजा

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. लाडक्या बाप्पाची १० दिवस मनोभावाने पूजा आणि सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. विसर्जनासाठी मार्गस्थ होण्यापूर्वी लालबागच्या राज्याची महाआरती करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे स्थानिक कोळी महिलांनी बाप्पाच्या आरतीनंतर काही वेळ पारंपारिक वाद्यांवर नृत्य सादर करत बाप्पाला साकडे घातले. त्यानंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. 

उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि विसर्जन मिरवणुक पहाण्यासाठी भाविकांनी लालबाग परिसरात मोठी गर्दी केली आहे. पारंपारिक पध्दतीने ढोल-ताशाच्या गजरात गणेशभक्त विसर्जन मिरवणुकीत नृत्य करत आहेत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जात आहे. लालबागच्या राजाची मिरवणुक ही २४ तास चालते. लालबाग, परळ, दोन टाकी, कुंभारवाडा असं करत बाप्पाची मिरवणूक शुक्रवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर पोहचणार आहे. त्यानंतर बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

बाप्पाच्या विसर्जनसाठी मुंबईत ५० हजार पोलिस तैनात