पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यासाठीच सर्वार्थाने खास आहे मुंबईतील गणपती विसर्जन सोहळा

मुंबई विसर्जन मिरवणूक

राज्यभरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मुंबईतील गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. मुंबईमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती जेवढ्या आकर्षक असतात तेवढाच आकर्षक देखावा असतो. ऐवढेच नाही तर मुंबईतला गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा देखील तितकाच खास असतो. हा मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. चला तर जाणू घेऊयात मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीची काही खास वैशिष्ट्ये. 

...म्हणून एकदा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हाच

- मुंबईतील गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याठिकाणी गणपतीच्या भव्य आणि आकर्षक मूर्ती असतात. 

- विशेष म्हणजे मुंबई शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक ही रात्रभर चालते. 

- गणपती बाप्पाचे विसर्जन समुद्र, तलाव आणि कृत्रिम तलावात केले जाते. 

- गणपती विर्सजन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वजण सहभागी होतात. 

- ढोल-ताशा आणि लेझिम पथक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. 

- आकर्षक सजावट केलेल्या ट्रकमध्ये बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघते. 

- विसर्जन मार्गावर भाविकांकडून बाप्पाच्या मुर्तीवर पुष्पवृष्टी केली जातो. 

- मोठ्या गणोशोत्सव मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी चौपट्यांवर येतात. त्यामुळे एकाच ठिकाणी लाखो भाविकांना गणपती विसर्जन पहायला मिळते.

PHOTOS : मुंबईत विसर्जन मिरवणुकीला सुरूवात