पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासन सोयी-सुविधांनी सज्ज

गणपती विसर्जन

लाडक्या बाप्पाची १० दिवस मनोभावाने पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईकरांसह मुंबई महानगर पालिका सुध्दा सज्ज झाली आहे. मुंबईतील चौपाट्या, तलाव आणि कृत्रिम तलावामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणपती विसर्जनासाठी गणेशभक्त याठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठी गर्दी करणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका याठिकाणी सर्व सेवा-सुविधांनी सज्ज झाली आहे. 

 

 

बाप्पाच्या विसर्जनसाठी मुंबईत ५० हजार पोलिस तैनात

मुंबईमध्ये १२९ ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. त्यासाठी पालिकेकडून ३२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचसोबत गिरगाव चौपाटीसह ६९ विसर्जनस्थळी पालिकेकडून सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चौपट्यांवर गर्दी होऊ नये आणि सुरळीत विसर्जन व्हावे यासाठी योग्य ती पावलं उचलण्यात आली आहेत. 

साताऱ्यात ट्रक-बसचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू २० जखमी

छोट्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ४५ जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ६३६ जीवरक्षकांसह ६५ मोटारबोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच विसर्जनाच्या ठिकाणी कचरा होऊ नये याची देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुलं आणि इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी २१८ निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

मेगा गळतीचे आत्मचिंतन करा! फडणवीसांचा विरोधकांना

दरम्यान, बाप्पाला निरोप देताना विशेष काळजी घ्यावी, खोल पाण्यात उतरु नये, भरतीच्या वेळी समुद्रापासून दूर रहावे, अंधार असलेल्या ठिकाणी विसर्जनाला जाऊ नये, विनामूल्य तराफ्यांचा आणि बोटींचा वापर करा, पोलिस आणि जीवरक्षकांच्या सुचनांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

पाणी टंचाईमुळे लातूरमध्ये यंदा गणेश विसर्जन नाही