पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाप्पाच्या विसर्जनसाठी मुंबईत ५० हजार पोलिस तैनात

मुंबई पोलिस

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. १० दिवस मनोभावाने बाप्पाची पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईकरांसह मुंबई पोलिस देखील सज्ज झाले आहे. मुंबईतील चौपाट्या, तलाव आणि कृत्रिम तलावांमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. याठिकाणी गणेश विसर्जन सुरळीत व्हावे तसंच कोणतिही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

साताऱ्यात ट्रक-बसचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू २० जखमी

मुंबईमध्ये ५० हजार पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. यामध्ये एसआरपीएफ, फोर्स वन, क्युआरटी, फोर्स वन रॅपिड अॅक्श फोर्स भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईतील गणपती मिरवणूक मार्ग आणि विसर्जनाच्या ठिकाणी हे पोलिस तैनात असणार आहेत. त्याचसोबत सुरक्षेच्या कारणास्तव चौपाट्या आणि विसर्जन मिरवणुकीवर मुंबई पोलिस ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार आहेत. 

संगीतकार उषा खन्ना यांना 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर

यंदाच्या वर्षी देखील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतूककोंडी होऊ नये, विसर्जन मिरवणुका आणि वाहन चालकांचीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईतील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. ५३ ठिकाणे वाहनांसाठी बंद असणार आहेत. तसंच ५३ दुहेरी मार्ग बंद करुन ते एकेरी बनवण्यात आले आहेत. १८ ठिकाणी अवजड वाहनांना बंदी आणि ९९ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. 

मेगा गळतीचे आत्मचिंतन करा! फडणवीसांचा विरोधकांना

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद व्यक्ती आणि वस्तूबाबत ताबडतोब पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. दरम्यान, बाप्पाला निरोप देताना विशेष काळजी घ्यावी, खोल पाण्यात उतरु नये, पोलिस आणि जीवरक्षकांच्या सुचनांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. 

राज्यातील वाहन धारकांना दिलासा! नव्या कायद्याला तूर्तास