पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाप्पा म्हणजे सकारात्मक ऊर्जा देणारा स्रोत: सायली संजीव

अभिनेत्री सायली संजीव

राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरी देखील गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. अभिनेत्री सायली संजीवच्या घरी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने पण अगदी उत्साहात साजरा केला जातो. तिच्या घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे विशेष कल दिला जातो. सायलीच्या घरी तिच्या हातून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. तिच्या घरी गौरीही असतात. गौरी-गणपती सण खूप उत्साहात साजरा केला जातो.

लालबागच्या राजाच्या चरणी भक्ताकडून आतापर्यंतच्या सर्वात महागड्या वस्तू अर्पण

नास्तिक असणाऱ्या सायलीला अचानक बाप्पाची ओढ कशी लागली याबाबत ती सांगते की, 'माझ्या आयुष्यात बाप्पाचं स्थान हे सगळ्यात उच्च आहे. बाप्पा आणि माझ्या नात्याबाबत सांगायचे, तर त्या मागे एक कारण आहे. मी आठवीत असताना माझे आजोबा वारले होते. तोपर्यंत मी तशी नास्तिक होते. माझा या गोष्टींवर फारसा विश्वासच नव्हता. मात्र आजोबा गेल्यानंतर मला काही गोष्टी आपसूकच जाणवू लागल्या आणि अचानक माझ्यात गणपती बाप्पाबद्दल ओढ निर्माण झाली. इतकी, की मी अक्षरशः बाप्पासोबत गप्पा मारायचे. त्यामुळे आई-बाबासुद्धा चकित झाले होते. आतापर्यंत देवाला न मानणारी मी, अचानक देवाविषयी इतकी भक्ती कशी निर्माण झाली माझ्यात? हे कसं झालं हे मला सुद्धा माहित नाही.'

बाप्पा माझ्या 'लग्नकल्लोळ' चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळू दे!

बाप्पा आणि आपल्या नात्याबद्दल सांयली सांगते की, 'बाप्पा आणि माझ्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. सगळ्यांनाच गणपती खूप जवळचा वाटतो. माझ्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे सकारात्मक ऊर्जा देणारा एक स्रोत आहे. माझ्या घरी सात दिवसांचा गणपती असतो. पूर्वी आमच्याकडे खूप सोवळं पाळायचे, जे आजही पाळले जाते. फक्त पुरुषांनीच गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करावी, अशा पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला मात्र मी खंड दिला. त्यासाठी मी घरी भांडले, आई - बाबांकडे हट्ट केला आणि अखेर मी जिंकले.'

मी धार्मिक नाही,पण बाप्पाशी माझं वेगळंच नातं: भूषण प्रधान

सायली बाप्पाविषयी सांगते की, 'गणपती बाप्पाची माझ्यावर भरपूर कृपा आहे. चांगल्या -वाईट प्रत्येक प्रसंगात तो माझ्या पाठीशी असतो. माझ्या प्रत्येक निर्णयात तो मला सद्बुद्धी देतो, जेणे करून चुकीच्या निर्णयापासून मी लगेच 'यु टर्न'घेऊ शकेन. त्याच्यामुळेच माझ्या पहिल्या 'यु टर्न' या वेबसिरीज बाबतीतही अनेक चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. त्याच्याच कृपेने मला आजपर्यंत अनेक चांगली कामं मिळाली, चांगली माणसं मिळाली.' असल्याचे सायलीने सांगितले. 

...म्हणून अमितचा यंदाचा गणेशोत्सव दणक्यात!