पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतल्या या १० प्रसिध्द गणेशोत्सव मंडळांना जरुर भेट द्या

मुंबई गणेशोत्सव

गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. राज्यासह देशभरामध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. १० दिवस चालणारा गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि भक्ती भावामध्ये साजरा केला जातो. बाप्पाच्या स्वागतासाठी विविधमंडळ आणि गणेशभक्तांना उत्कंठा लागली आहे. 

भारतातील महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यामध्ये मुंबईमधील गणेशोत्सव पहाण्यासारखा असतो. कारण मुंबईमधील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आकर्षक गणेश मूर्त्यांसह आकर्षक सजावट सुध्दा करतात. या गणोशोत्सव मंडळातील गणपती पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होत असते. अशाच मुंबईतल्या १० प्रसिध्द गणेशोत्सव मंडळांना तुम्ही भेट देऊ शकता. 

गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ, किंग सर्कल - 

किंग सर्कल येथील गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळाला मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ मानले जाते. यंदा या गणेशोत्सव मंडळाचे ६५ वं वर्ष आहे. या गणोशोत्सव मंडळाच्या गणेशाची मूर्ती ही शाडूच्या मातीची तयार केली जाते. या मंडळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. या मंडळाचा गणपती 'सोन्याचा गणपती' म्हणून देखील ओळखला जातो. पूजे दरम्यान याठिकाणी एका बैठकीमध्ये हजारापेक्षा जास्त गणेशभक्त प्रसादासाचा लाभ घेतात. तर, दररोज दोन लाखांपेक्षा अधिक गणेशभक्त दर्शनासाठी येतात. 

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ, लालबाग - 
लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वात मोठे आणि प्रसिध्द गणेशोत्सव मंडळ आहे. लालबागच्या राजाची स्थापना १९३४ साली करण्यात आली. कांबळी कुटुंबिय १९३५ सालापासून लालबागच्या राजाची मूर्ती बनवत आहेत. मुंबईच नाही तर देशभरातील अनेक गणेशभक्त लालबागच्या राज्याच्या दर्शनला येत असतात. गणेशभक्तांसाठी २४ तास लालबागच्या राजाचे दर्शन सुरु असते. या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ८७ वं वर्ष आहे. यावर्षी चांद्रयान मोहिमेच्या संकल्पनेवर देखावा उभारण्यात आला आहे. 

गणेश गल्लीचा राजा गणेशोत्सव मंडळ, लालबाग - 
मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग परिसरातील गणेशगल्लीचा राजा या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ९२ वं वर्ष आहे. हे गणेशोत्सव मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेवर सजावट करत असते. यंदाच्या वर्षी या गणेशोत्सव मंडळाने राम मंदिराचा देखावा उभारला आहे. पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न हे गणेशोत्सव मंडळ करत असते. 

केशवजी नाईक चाळ गणेशोत्सव मंडळ, गिरगाव - 
गिरगावमधील केशवजी नाईक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतील सर्वात प्रसिध्द गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या उत्सवाचा आदर्श ठेवून १८९३ साली केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सुरुवात करण्यात आली होती. या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे १२७ वं वर्ष आहे. पारंपारिक पध्दतीने याठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. 

चिंचपोकळीचा राजा गणेशोत्सव मंडळ, चिंचपोकळी - 
हे मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ आहे. या गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९२० साली करण्यात आली होती. चिंचपोकळीच्या राज्याला 'चिंतामणी' म्हणून ओळखले जाते. या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे ९९ वं वर्ष आहे. हे गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यावर मोठा भर देते. गणेशोत्सव काळात जमा झालेल्या रक्कमेपैकी ६० टक्के रक्कम वर्षभर सामाजिक कार्यावर खर्च केली जाते. 

आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंधेरी - 
आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे देखील मुंबईतील प्रसिध्द गणेशोत्सव मंडळ आहे. १९६६ साली गिरणी कामगारांनी या गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली होती. या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ५४ वं वर्ष आहे. 

फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोर्ट - 
फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे देखील मुंबईतील प्रसिध्द गणेशोत्सव मंडळ आहे. या मंडळाचा गणपती फोर्टचा राजा या नावाने ओळखला जातो. या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ६४ वं वर्ष आहे. 

सह्याद्री क्रीडा मंडळ, चेंबूर - 
सह्याद्री क्रीडा गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतील प्रसिध्द गणेशोत्सव मंडळ आहे. हे गणेशोत्सव मंडळ दरवर्षी मंदिराचा देखावा उभारत असते. मागच्या वर्षी या गणेशोत्सव मंडळाने राम मंदिर उभारले होते. टिळक नगरमधील सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना १९७७ साली करण्यात आली होती. या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे या ४४ वं वर्ष आहे. 

खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ -
खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९५९ साली करण्यात आली होती. यंदाचे हे या गणेशोत्सव मंडळाचे ६१ वं वर्ष आहे. या गणेशोत्सव मंडळाकडून बाप्पांच्या भव्यदिव्य आणि आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. 

परळचा राजा गणेशोत्सव मंडळ, परळ -
परळच्या नरेपार्क येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे परळचा राजा. या मंडळाची स्थापना १९४७ साली करण्यात आली होती. यंदाचे हे या गणेशोत्सव मंडळाचे ७३ वं वर्ष आहे. यावर्षी चांद्रयान मोहिमेच्या संकल्पनेवर या गणेशोत्सव मंडळाने देखावा उभारला आहे.