पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Gadchiroli हल्ला : शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

शरद पवार

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या वेदनादायी भूसुरुंग स्फोटात १६ पोलिस शहीद झाल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. पण त्याचवेळी जनाची नाही तरी मनाची लाज असते, अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही, अशी टीकाही सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात १६ पोलिस शहीद, महाराष्ट्रावर शोककळा

शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असेही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सध्याच्या राजकर्त्यांकडून राजीनाम्याची अपेक्षा ठेवता येणार नाही. त्यामुळे या हल्ल्याचा तीव्र निषेध आणि शहीद झालेल्या जवानांबद्दल दुःख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Gadchiroli नक्षलवादी हल्ला : सोशल मीडियावर हळहळ

गडचिरोलीत भूसुरूंग स्फोटामध्ये १६ पोलिस बुधवारी शहीद झाले. ऐन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस शहीद झाल्यामुळे सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.