पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुलभूषण जाधव प्रकरणाच्या निकालानंतर मुंबईत जल्लोष 

कुलभूष यांचा मित्र परिवार

हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवत न्यायालयाने निकाल भारताच्या बाजूने लावला. त्यामुळे कुलभूषण जाधव यांच्या मुंबईतील मित्र परिवाराने जल्लोष केला आहे.

kulbhushan jadhav verdict live : फाशीच्या शिक्षेला स्थगिती कायम

मुंबईत राहणारे कुलभूषण जाधव यांच्या मित्र परिवार आणि कुटुंबियांनी न्यायालयाच्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा केला आहे. आकाशामध्ये फुगे सोडून आणि मिठाईचे वाटप करत त्यांनी जल्लोष केला आहे. तसंच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत देखील केले आहे. कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर सुनावणी होण्यापूर्वी त्यांच्या मित्र परिवारने देवाकडे प्रार्थना देखील केली होती.

Kulbhushan Verdict : हा भारताचा विजय, निकालाचं नेत्यांकडून स्वागत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Friends of Kulbhushan Jadhav celebrate after International Court of Justice in favour of India