पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्न जुळवणाऱ्या साईटवरून ओळख झालेल्या पुरुषाकडून महिलेची फसवणूक, पावणेतीन लाखांना गंडा

प्रातिनिधिक छायाचित्र

विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका व्यक्तीने महिलेची फसवणूक करून तिला पावणेतीन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील पवई पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिला ही पूर्वी एका विमान कंपनीत काम करीत होती. काही दिवसांपूर्वीच तिची नोकरी गेल्याने ती सध्या घरीच होती. 

खूशखबर!, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सातवा वेतन आयोग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटवरून या दोघांची ओळख झाली होती. समोरच्या पुरुषाने त्याची ओळख करून देताना तो अमेरिकेत स्थायिक असल्याचे सांगितले होते. मुंबईला या महिलेला भेटायला येत असताना त्याच्या जहाजांना सोमालियाच्या चाच्यांनी गाठले. जहाजाच्या कॅप्टनने ते जवळच्या एका बेटाकडे नेले.  आपल्याकडील रोकड आणि ऐवज चोरीला जाऊ नये, या भितीने त्याने हा ऐवज बेटावरून एका खासगी संस्थेमार्फत मुंबईला पाठवला असल्याचे त्याने या महिलेला सांगितले. त्याचबरोबर तो सोडवून घेण्याची मागणी केली. ऐवज देण्यासाठी महिलेकडे पावणे तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तिने वेगवेगळ्या बँकांमध्ये ते पैसे भरले. 

पैसे भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने लगेचच पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

... तर नरेंद्र मोदी यांनी देशहिताला धोका दिला - राहुल गांधी

फसवणूक झालेल्या महिलेच्या आईने विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटवर तिची माहिती भरली होती. मे महिन्यात या महिलेला एक मेसेज आला. करुणाकर रेड्डी नावाच्या व्यक्तीला तुमचे प्रोफाईल आवडले असल्याचे त्या मेसेजमध्ये लिहिले होते. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना आपले नंबर दिले आणि मग ते एकमेकांशी बोलू लागले. 

संबंधित पुरुषाने आपण अभियंता असून, अमेरिकेत एका कंपनीत काम करीत असल्याचे महिलेला सांगितले. लवकरच आपण भारतात स्थलांतरित होणार असल्याचेही त्याने सांगितले. त्याचबरोबर या पुरुषाने संबंधित महिलेला लग्नाचे आश्वासनही दिले होते.