पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'फ्री काश्मीर'चे पोस्टर का झळकावले, मेहक प्रभूने केला खुलासा

मेहक प्रभू

जेएनयू हिंसाचाराविरोधात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे अनेक विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान एका तरुणीने फ्री काश्मीरचे पोस्टर झळकावले. त्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर फ्री काश्मीरचे पोस्टर झळकावणारी तरुणी मेहक मिर्झा प्रभू हिने स्पष्टीकरण दिले आहे. 'मी काश्मिरी नाही. मी मुंबईत जन्मली आहे आणि इथंच वाढली आहे. काल माझ्या फोटोवरुन जे पसरवलं गेलं, तो मुर्खपणा आहे, असे मेहकने सांगितले.

पाच वर्षांत फडणवीसांनी महाराष्ट्र ओरबाडून टाकला, अनिल गोटेंचा आरोप

या पोस्टरवरुन राजकारण तापले आहे. एएनआयने मेहकचा पोस्टर घेतलाला व्हिडिओ ट्विट केला होता तो व्हिडिओ शेअर करत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तर या तरुणीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी देखील या व्हिडिओवरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

इराणने अमेरिकन सैन्याला 'दहशतवादी' घोषित केले

दरम्यान, या सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर पोस्टर झळकावणारी तरुणी मेहक मिर्झा प्रभूने फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहेत. त्यामध्ये तिने असे म्हटले आहे की, 'काल माझ्या फोटोवरुन जे पसरवलं गेले तो मुर्खपणा आहे. लोकांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या. त्या तर आणखी त्रासदायक होत्या. त्या फोटोवरुन जे पसरवलं गेलं ते चुकीचे आहे. मी काश्मिरी नाहीये, मी मुंबईची आहे. माझा जन्म मुंबईत झाला आहे. मी महाराष्ट्रीयन आहे. मी इथेच मोठी झाली आहे. 

'काश्मीरला भारत मुक्त करा असे म्हटले तर खपवून घेणार नाही'

६ जानेवारीला संध्याकाळी ७ च्या सुमारास मी मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाजवळील आंदोलनस्थळी गेले. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या इतर अनेक जणांसारखंच मी सुध्दा त्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्याठिकाणी अनेक ग्रुप होते त्यातील काही जण गाणी गात होते तर काही जण घोषणा देत होते. गेट वे ऑफ इंडियावर फिरत असताना तिथे काहीजण वेगवेगळ्या मुद्द्यांबाबत पोस्टर तयार करत होते. एनआरसी, सीएए या मुद्द्यांवर पोस्टर तयार केले जात होते. 

VIDEO: गुजरातमध्ये ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये तुफान

त्याचठिकाणी एका बाजूला एक पोस्टर पडले होते त्यावर  'फ्री काश्मीर' असे लिहिले होते. मी ते पाहिल्यावर, माझ्या मनात आले की आपण इथे आलोय ते संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याबाबत चर्चा करण्यासाठी. इंटरनेट बंदीमुळं गेल्या ५ महिन्यांपासून काश्मीरपासून हा हक्क हिरावून घेतला जातोय. ते आपले आहेत असे आपण म्हणत असू, तर त्यांना मुलभूत हक्क मिळाले पाहिजेत. जसे आपल्याला मिळतायत. याच हेतूनं मी ते पोस्टर उचलले. 

गेट वे ऑफ इंडिया आंदोलनाचे ठिकाण नाही: गृहमंत्री

'फ्री काश्मीर' पोस्टरसोबत माझ्या हातात त्यावेळी गुलाबाचे फुलंही होते. फ्री काश्मीर पोस्टरचा अर्थ चुकीचा काढला गेला. मी कुठल्या तरी गटाशी संबंधित आहे. मला पैसे देऊन उभं केलेय असे अनेक आरोप माझ्यावर करण्यात आले. मात्र, तसं काही नाही, असे मेहकने सांगितले. तसंच ऐवढे घाबरुन जगणं आम्हाला नकोय, असे व्हिडिओमध्ये शेवटी मेहकने सांगितले आहे. 

जेएनयू हिंसाचार: आयशी घोषसह २२ विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल