राज्यातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबईत आता आणखी एक संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८१ वरः आरोग्य मंत्रालय
हा रुग्ण घाटकोपर पूर्वमधील असल्याचे सांगण्यात येते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या ठिकाणच्या व्यायामशाळा (जिम), नाट्यगृहे, जलतरण तलाव (स्विमिंग पूल) आणि चित्रपटगृहे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा, महाविद्यालये बंद असतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी विधानसभेत जाहीर केले. ३० मार्चला याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबई, पुण्यातील जीम, स्विमिंग पूल, थिएटर बंद करण्याचा निर्णय