पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! तळोजामध्ये एका घरात सापडले चौघांचे मृतदेह

डोंबिवली हत्या प्रकरण

नवी मुंबईतील तळोजा येथे एका घरामध्ये चौघांचे मृतदेह आढळले आहे. तळोजा फेज १ येथे सेक्टर ९ मधील शिव कॉर्नर सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृतदेह आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. 

 

गुजरातमध्ये जे झालं, ते वारिस पठाण यांनी विसरु नयेः भाजप नेता

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब भाडेतत्वावर राहत होते. दोन महिन्यापूर्वी या चौघांचा मृत्यू झाला आहे. पतीने पत्नीसह दोन लहान मुलांची हत्या करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेमुळे तळोजामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

स्वरा म्हणते, या सरकारवर भरवसाच नाय!

शिव कॉर्नर सोसायटीमध्ये राजेश भारद्वाज यांचे घर आहे. हे घर त्यांनी आठ महिन्यांपूर्वी नितीश कुमार उपाध्याय यांना भाड्याने दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून उपाध्याय यांनी घराचे भाडे दिले नव्हते. त्यामुळे भारद्वाज शनिवारी सकाळी थकलेले भाड्याचे पैसे मागण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना समोर आली. 

चलो अयोध्या! उद्धव ठाकरे ७ मार्चला घेणार श्रीरामाचे दर्शन