पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शीना बोरा प्रकरणात देवेन भारतींनी महत्त्वाची माहिती लपवली: राकेश मारिया

शीना बोरा प्रकरणात देवेन भारतींनी महत्त्वाची माहिती लपवल्याचा दावा राकेश मारिया यांनी केलाय

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाशी संबंधीत आरोपी पीटर, इंद्राणी मुखर्जी यांच्याबाबत महत्त्वाची माहिती तत्कालिन सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी लपवल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी केला आहे. 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकातील एका प्रकरणातून त्यांनी या प्रकरणावर  भाष्य केले आहे. 

माझ्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास; इंदोरीकर महाराजांची दिलगिरी

खार पोलिसांनी शीना बोरा हत्येचा छडा लावला त्यावेळी राकेश मारिया आयुक्त होते. साधारणत: १४ दिवस सुरू असलेल्या तपासात चार वेळा खार पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती त्यांनी या प्रकरणात दिली आहे. याच ठिकाणी पीटर आणि इंद्राणी यांना पहिल्यांदा भेटलो असेही त्यांनी नमुद केले आहे.

राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या; पवारांचे फडणवीसांना

शीना बोरा बेपत्ता झाली हे तुझ्या मुलाने सांगितले त्यानंतर तू काहीच का केले नाहीस, असा सवाल मी पीटरला केला होता. यावेळी शीना बेपत्ता झाल्यानंतर काहीच दिवसांत देवेन भारती यांची आम्ही दोघांनी भेट घेतली होती, अशी माहिती पीटरने दिली होती. या प्रकरणाबाबत  देवेन भारती यांच्यासोबत अनेकदा सल्लामसलत करत होतो, सोबत खार पोलीस ठाण्यापर्यंत एकत्रही जायचो, असे असूनही भारती यांनी हे महत्त्वाचे तपशील का लपवले, असा सवाल मारिया यांनी या उपस्थित केला आहे.

ब्रिटिश खासदाराला परत पाठवले, काँग्रेस नेत्याने केले समर्थन

बॉलिवूडशी संबंधित कुटुंबाशी मारिया यांचा जवळचा संबंध असल्यामुळेच कदाचित पटकथा लेखनाचा हा प्रभाव असावा, अशा शब्दांत देवेन भारती यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. खटला सुरू असल्याने याविषयावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे देवेन भारती यांनी म्हटले आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Former Mumbai Police Commissioner Rakesh Marias shocking revelations about the Sheena Bora murder case in Let Me Say It Now book