पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

अरविंद इनामदार

राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

अरविंद इनामदार यांची पोलीस महासंचालक म्हणून कारकिर्द खूप गाजली होती. पोलिस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर ते नेहमी भाष्य करायचे. त्यामुळे ते सतत चर्चेत असायचे.  प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. ते लेखक म्हणून देखील प्रसिध्द होते. 

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडं