पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमित शहा मुंबई दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमित शहा मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. अमित शहा अशावेळी महाराष्ट्रात आले आहेत जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारने बहुमत चाचणी सिध्द करुन दाखवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १६९ आमदारांनी मतदान केले. महाराष्ट्र विधानसभेत बहुमताचा आकडा १४५ होता.

छत्रपतींच्या, आई-वडिलांच्या नावानं शपथ घेणं गुन्हा नाहीः उद्धव

फडणवीसांनी खडसेंकडे 'क्लास' लावावा: नवाब मलिक

अमित शहा यांचे बहुमत चाचणीच्या वेळी राज्यात येणे महत्वाचे मानले जात आहे.  भाजपाचे राज्यातील राजकारण आणि रणनीती याबाबत चर्चा करण्यासाठी शाह मुंबईत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याआधी, संसद भवन येथे मागच्या मंगळवारी पंतप्रधान मोदींसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा आणि कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याबाबत निर्णय झाला होता. 

'२२ डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:former chief minister devendra fadnavis receives union home minister amit shah at mumbai airport