पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा: अनिल गोटे

अनिल गोटे

भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा', असे शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. भविष्यात एक डझन आमदार माझ्यासोबत असतील असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. 

'पक्षाविरुध्द कारवाई केली तर गय केली जाणार नाही'

देवेंद्र फडणवीस कायम खोटे बोलत आले आहेत. म्हणून मी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजासोबत सर्वांचीच फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच, इतका कपटी माणूस आजपर्यंत मी पाहिला नाही, असे त्यांनी सांगितले. 

संस्कृतमधून बोलल्यास मधुमेह, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो - भाजप

दरम्यान, धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये डावल्यामुळे अनिल गोटे नाराज झाले होते. नाराज झालेल्या अनिल गोटे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते सततच भाजपवर टीका करताना दिसत आहेत. धुळे महानगर पालिका निवडणुकीत त्यांनी 'लोकसंग्राम' पक्षाची स्थापना केली होती. 

राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी: नागरिकत्व सुधारणा कायदा लागू