पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्येच्या निकालात अनेक त्रुटी, यशवंत सिन्हा यांची टीका

यशवंत सिन्हा

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी टीका केली. त्याचवेळी त्यांनी मुस्लिम समुदायाने न्यायालयाचा निकाल स्वीकारला पाहिजे, असेही म्हटले आहे. मुंबईमध्ये साहित्य महोत्सवाच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना यशवंत सिन्हा यांनी आपले मत मांडले.

'मुख्यमंत्रीपदाच्या अटीवरूनच तर सेनेनं लोकसेभेत युती केली'

रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया विचारली असता यशवंत सिन्हा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला आहे. यामध्ये अनेक त्रुटी आहेत. पण तरीही मुस्लिम समुदायाने हा निकाल स्वीकारला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आपला अंतिम निकाल दिला आहे. आता आपण पुढे सरकले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या निकालानंतर यशवंत सिन्हा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यावरही टीका केली. बाबरी मशिद पाडल्यानंतर अडवानी आणि भाजपच्या अन्य काही नेत्यांना पश्चाताप झाला होता. पण आता तेच लोक राम मंदिर आंदोलनाचे श्रेय लाटू लागले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

सोनिया गांधी-शरद पवार यांच्यातील बैठक ठरली! तिढा सुटणार की...

अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्ला विराजमान अर्थात हिंदू पक्षकारांना देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याचवेळी एकूण जमिनीपैकी पाच एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.