पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इतक्या वर्षांत साहेब पहिल्यांदाच चिडलेः सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे

गेल्या ५०-५५ वर्षांपासून ते राजकारणात आहेत. पण इतक्या वर्षांत ते कधीच कोणावर चिडले नव्हते, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी व्यक्त केले आहे. शुक्रवारी श्रीरामपूर येथे पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राष्ट्रवादीतून होत असलेल्या गळतीबाबत बोलताना तुमचे नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याचा उल्लेख पद्मसिंह पाटील यांच्या अनुषंगाने केला. त्यावर पवार भडकले होते. त्याविषयी सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना ही टोला लगावला. स्वतःच्या स्वार्थासाठी मुलं आपल्या वडिलांना वेठीस धरत असल्याचे त्यांनी म्हटले. 

पद्मसिंह पाटलांसंबधीच्या प्रश्नांवर शरद पवार भडकले

त्या म्हणाल्या, गेल्या ५०-५५ वर्षांच्या राजकारणात शरद पवार कधीच चिडले नाहीत. पण वडिलांच्या वयाच्या माणसाला एकच प्रश्न सारखेसारखे विचारुन त्रास देण्याचा हा प्रकार आहे, हे लक्षात घ्यायला हवा. मी त्यांना कधीच चिडल्याचे पाहिले नाही. मलाही याचे आश्चर्य वाटले. 

पक्ष सोडून जाणाऱ्यांविषयी त्या म्हणाल्या की, स्वतःच्या कुठल्या तरी स्वार्थासाठी मुले आपल्या वडिलांना वेठीस धरत आहेत. वंशाच्या दिव्यापेक्षा मुली बऱ्या. मुली बापाला कुणापुढे झुकू देत नाहीत. वैयक्तिक गोष्टींसाठी पक्ष बदलले जात आहेत. 

विरोधी पक्षनेतेपद वंचितकडे असेल, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

दरम्यान, एका पत्रकाराने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पक्षांतराबाबत प्रश्न विचारताना उस्मानाबादचे पक्षाचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला. परंतु, संबंधित पत्रकाराने प्रश्न विचारताना तुमचे नातेवाईक पक्षापासून दूर का जात आहेत, असा प्रश्न विचारला. त्यामुळे शरद पवार हे संतापले. यात नातेवाईकांचा काय संबंध, नातेवाईकांचा प्रश्न आला कोठून, असे म्हणत ते पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली. त्यावेळी इतर पत्रकारांनी त्यांची माफी मागितली. त्यानंतर पत्रकार परिषद पुढे सुरु झाली. 

घरकुल घोटाळाः सुरेश जैन, देवकरांसह सर्व ४८ आरोपी दोषी