पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अडकलेल्या रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी बीएमसीने घेतला पुढाकार

मुंबई पाऊस

पावसामुळे अडकलेल्या रेल्वे प्रवाश्यांसाठी बीएमसीने रेल्वे स्थानकांभोवती असलेल्या १४५ शाळांमध्ये तात्पुरते आपत्कालीन आश्रयस्थान सुरू केले आहे. त्याठिकाणी पाण्याची, खाण्याची आणि बसण्याची व्यवस्था केली आहे. त्याचसोबत याठिकाणी वैद्यकीय मदत देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

UAPA:मसूद अजहर, हाफिज सईद व दाऊद इब्राहिम दहशतवादी 

तर रेल्वे रुळावर पावसाचे पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा ठप्प झाली आहे. कुर्ला-सायन रेल्वे स्थानका दरम्यान एकापाठोपाठ एक लोकल उभ्या आहेत. या लोकलमध्ये अडकलेल्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे पोलिसांनी सुटका केली. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

सात वर्षांत पहिल्यांदाच मारुतीचा प्लांट २ दिवस बंद राहणार

दरम्यान, कुर्ला स्थानकातून ठाण्यासाठी विशेष लोकलही सुटली. तर अंधेरीहून चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना झाली आहे. चर्चगेट ते वसई जलद लोकलसेवा सुरु झाली आहे. चर्चगेटवरुन वसईच्या दिशेने पहिली लोकल सुटली आहे. तब्बल ४ तासानंतर लोकलसेवा सुरु झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र वसई रोड ते विरार लोकलसेवा अजूनही ठप्प आहे. 

काश्मिरात दोन जिवंत दहशतवाद्यांना लष्कराने पकडले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:for stranded railway commuters BMC has opened temporary emergency shelters at 145 schools