पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुर्ल्याच्या क्रांतीनगरमध्ये मिठी नदीचे पाणी शिरले; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

कुर्ला क्रांतीनगर

मुंबई शहरासह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कुर्ल्यामध्ये पावसामुळे रस्त्यांना नदीचे रुप आले आहे. पावसामुळे कुर्ल्यातील मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. मिठी नदीचे पाणी कुर्ला पश्चिमेकडील विमातळ परिसरातील क्रांतीनगरमध्ये शिरले आहे. याठिकाणी अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफचे पथक आणि भारतीय नौदलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. 

UAPA:मसूद अजहर, हाफिज सईद व दाऊद इब्राहिम दहशतवादी 
 
मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. नदीचे पाणी क्रांतीनगर परिसरामध्ये शिरले आहे. त्यामुळे याठिकाणी कमरे इतके पाणी साचले आहेत. या भागामध्ये अडकलेले वयोवृध्द, लहान मुलं त्याचसोबत महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, एनडीआरएफची टीम आणि नौदलाच्या जवानांकडून बचावकार्य केले जात आहे. क्रांतीनगर परिसरामध्ये अडकलेल्या १३०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

सात वर्षांत पहिल्यांदाच मारुतीचा प्लांट २ दिवस बंद राहणार

मुंबईमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. येत्या २४ तासामध्ये मुंबईत मुसधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गरज पडल्यास घराबाहेर पडावे. सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. सध्या मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तर रस्त्यांवर पाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 

काश्मिरात दोन जिवंत दहशतवाद्यांना लष्कराने पकडले