पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईः नागपाडा परिसरात इमारतीला आग, पाच जण जखमी

कामाठीपुरा परिसरात इमारतीला आग, पाच जण जखमी (Photo by Pratik Chorge)

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा (नागपाडा) येथील चिनॉय इमारतीला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीत पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. जखमींना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपाडा येथील चिनॉय इमारतीच्या तळमजल्याला आग लागली. अग्निशामक दलाचे चार फायर इंजिन आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. परंतु, निमुळत्या गल्ल्यांमुळे अग्निशामक दलाची केवळ एकच गाडी घटनास्थळापर्यंत गेली. या गाडीमार्फतच आग विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आगीत पाच जण जखमी झाल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. जखमींना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त समजू शकलेले नाही.