पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

७ महिन्यांच्या गर्भवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर तलाक, देशातील पहिला गुन्हा मुंब्रा ठाण्यात

व्हॉट्स अ‍ॅप

तीन दिवसांपूर्वी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले आणि शुक्रवारी याप्रकरणी पहिला गुन्हा मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवर तलाक देणाऱ्या पतीच्या विरोधात मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा कलम-२०१९ अंतर्गत गुन्हा ठाणे पोलिस आयुक्तालयातील मुंब्रा ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संसदेने या कायद्याला मान्यता दिल्यानंतरचा देशातील हा पहिला गुन्हा ठरला आहे.

तिहेरी तलाक विरोधी कायदा लागू, राष्ट्रपतींची मंजुरी

पतीने व्हॉट्सअ‍ॅपवर तीन वेळा तलाक असा मेसेज पाठवला. तो महिलेच्या आईला तिच्या मोबाइलवर स्क्रीन शॉटद्वारे पाठवला. याची तक्रार पीडित महिलेने दिली होती. 

तिहेरी तलाक विरोधी विधेयक असंविधानिक : असुदुद्दीन ओवेसी

मुंब्रा परिसरात राहणाऱ्या महिलेचा इम्तियाज पटेल याच्यासोबत विवाह झाला होता. दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. इम्तियाज हा अबुधाबी येथे नोकरीला आहे. लग्नानंतर माहेरहून पैसे आण म्हणून पती, सासू नणंद यांनी शारीरिक व मानसिक छळ केला, असे तक्रारीत म्हटले आहे. या महिलेचा मुलगा सहा महिन्यांचा आहे. 

अखेर मुस्लिम महिलांना न्याय मिळाला; तिहेरी तलाकच्या प्रथेतून सुटका

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:First case in Maharashtra under new triple talaq Act in mumbra police thane booked for giving triple talaq on WhatsApp