पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐरोलीमध्ये हॉटेलबाहेर दोन टोळीत गोळीबार; एक जण जखमी

गोळीबार (प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी मुंबईच्या ऐरोली परिसरामध्ये दोन गटामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऐरोलीच्या गरम मसाला हॉटेलच्या मागे ही घटना घडली आहे. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. रबाळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. 

प. महाराष्ट्र, कोकणात दमदार पाऊस; विदर्भ, मराठवाड्यात प्रतिक्षाच

ज्या दोन टोळींमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे ते सर्व जण भांडूप येथील असल्याची माहिती समोर येत आहे. अमित भोगले आणि सागर जाधव असं या टोळींचे नाव आहे. ऐरोली येथील गरम मसाला हॉटेल अॅण्ड बारमध्ये सागर जाधव हा आपल्या साथिदारांसोबत आला होता. त्याचठिकाणी अमित भोगले यांची देखील टोळी आली होती. दोन्ही टोळीमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर सागर जाधव त्या ठिकाणावरुन पळू लागला. त्यावेळी अमित भोगले टोळीने गोळीबारा केला. मात्र गोळी कोणाला लागली नाही.

जयकुमार गोरेंना पाडा, सर्वपक्षीय बैठकीत निर्धार

यावेळी, सागर जाधव हॉटेलच्या मागच्या बाजूने पळून गेला. त्याठिकाणी असलेल्या संरक्षण भिंतीवरुन त्याने उडी मारुन पळ काढला. मात्र यावेळी खाली पडल्याने आणि काच लागल्याने तो जखमी झाला. गोळीबाराची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गोळीबार करणारी दोन्ही टोळी या भांडूपच्या असून त्या तडीपार आहेत. याप्रकरणाचा तपास रबाळे पोलीस करत आहेत. 

मालिकावीर विल्यम्सनलाही सचिनचा रेकॉर्ड ब्रेक करणं जमलं