पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भायखळ्यातील लाकडाच्या वखारीला भीषण आग

भायखळ्यात भीषण आग

मुंबईतल्या भायखळ्यामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. माझगाव येथील मुस्तफा मार्केटमध्ये एका लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आहे. संत सावता मार्गावर ही लाकडाची वखार आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी  दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

इम्रान खान भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याच्या विचारात

मुस्तफा मार्केटमधील लाकडाच्या वखारीला मध्यरात्री अडीचच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन आणि १२ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. लाकडाला आग असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

'मंदीवर बोलण्यापूर्वी तुमच्या काळातील अर्थमंत्र्यांशी चर्चा करा'