वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, इमारतीमध्ये अडकलेल्या ८४ कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण अस्पष्टच आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवलं
PHOTOS : MTNL इमारतीला आग, बचावासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
Mumbai: A level 4 fire has broken out in MTNL Building in Bandra, 14 fire tenders are present at the spot. Fire fighting operations are underway. More details awaited. pic.twitter.com/e7NRsYH7O3
— ANI (@ANI) July 22, 2019
सव्वा तीनच्या सुमारास एमटीएनएल इमारतीला भीषण आग लागली. आगीमुळे एमटीएनएल इमारत परिसरामध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागल्यामुळे वरच्या मजल्यावर अनेक जण अडकले होते. इमारतीमध्ये अडकलेले टेरेसवर उभे राहून मदतीची मागणी करतानाचे चित्र पाहायला मिळाले.
#WATCH Mumbai: A level 4 fire has broken out in MTNL Building in Bandra, 14 fire tenders are present at the spot. Fire fighting operations are underway. Approximately 100 people are reportedly trapped on the terrace of the building. More details awaited. pic.twitter.com/CVCAP8Tjj2
— ANI (@ANI) July 22, 2019
मागच्या आठवड्यात अग्निशमन दलाने लाँच केलेले फायर फायटिंग रोबोट देखील घटनास्थळी पाठवण्यात आला होता. मात्र हा रोबो आग विझवण्यात सपशेल अपयशी ठरला. यावर तब्बल १ कोटी खर्च करण्यात आला असल्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जावू शकते.