पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वांद्र्यातील MTNL इमारतीला आग; ८४ कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागली आहे (छाया सौजन्य : सत्यव्रत त्रिपाठी)

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  दरम्यान, इमारतीमध्ये अडकलेल्या ८४ कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.  आगीचे कारण अस्पष्टच आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवलं 

PHOTOS : MTNL इमारतीला आग, बचावासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
 

सव्वा तीनच्या सुमारास एमटीएनएल इमारतीला भीषण आग लागली. आगीमुळे एमटीएनएल इमारत परिसरामध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागल्यामुळे वरच्या मजल्यावर अनेक जण अडकले होते.  इमारतीमध्ये अडकलेले टेरेसवर उभे राहून मदतीची मागणी करतानाचे चित्र पाहायला मिळाले.  

मागच्या आठवड्यात अग्निशमन दलाने लाँच केलेले फायर फायटिंग रोबोट देखील घटनास्थळी पाठवण्यात आला होता. मात्र हा रोबो आग विझवण्यात सपशेल अपयशी ठरला. यावर तब्बल १ कोटी खर्च करण्यात आला असल्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जावू शकते.