पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीएसटी भवनची आग आटोक्यात, कुलिंग ऑपरेशन सुरु

जीएसटी भवनला आग

मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ८ व्या आणि ९ व्या मजल्यावर आग लागली आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या तीन तासांपासून प्रयत्न सुरु होते. सध्या आग अटोक्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. या आगीमध्ये कोणी जखमी झाले नाही. 

भारताच्या विकासदराच्या अंदाजात मूडीजकडून आणखी कपात

आग लागलेल्या इमारतीत जीएसटी भवनामध्ये जीएसटी कार्यालयाशिवाय सरकारच्या अन्य विभागाचे कार्यालय सुद्धा आहेत. सुरुवातीला इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग लागली. नंतर ती हळू हळू नवव्या मजल्यापर्यंत गेली. या आगीमध्ये अनेक महत्वाची कागदपत्र जळून खाक झाल्याची माहिती सांगितली जात आहे. या आगीमुळे जीएसटी भवन परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. 

... अखेर एअरटेलने १०००० कोटी सरकारकडे जमा केले

आग लागल्यानंतर जीएसटी भवनची इमारत तातडीने खाली करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती कळताच वाय बी चव्हाण सेंटर येथे सुरु असलेली बैठक सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून जास्तीत जास्त गाड्या पाठवण्यास आयुक्तांना सांगितले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.