पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

भिवंडीतील गोदामाला आग

भिवंडीतील दापोडा परिसरात असलेल्या प्रेरणा कंपाउंड येथील एका रसायनाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आज (मंगळवार) पहाटेच्या सुमाराला या गोदामात आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते. या गोदामात स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीचे कारण समजू शकलेले नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.  आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शेजारी रहिवासी परिसर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.