पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंबिवली एमआयडीसीतील आगीवर नियंत्रण, कुलिंग ऑपरेशन सुरु

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील मेट्रो पॉलिटीन एक्सिम कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास लागलेल्या आगीने संपूर्ण डोंबिवलीमध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कंपनीत केमिकलचा साठा मोठ्याप्रमाणात असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण गेले. मध्यरात्रीच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु, अजूनही आग धुमसत असल्याचे सांगण्यात येते. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. आणखी काही तास हे कुलिंग ऑपरेशन सुरु राहिल, असे सांगण्यात येते. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून शॉट सर्किटमुळे आग लागली असावी, असा  प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

माझ्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास; इंदोरीकर महाराजांची दिलगिरी

एमआयडीसी परिसरातील शाळा तसेच परिसरातील आजुबाजुच्या कंपन्या सोडून देण्यात आल्या. नागरिकांनी आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना देखील रस्त्यावर आणले. मिळेल ती रिक्षा पकडून नागरिकांनी  सुरक्षित स्थळी जाणे पसंत केले. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर अनेक जण आपले दुपारचे जेवण अर्धवट सोडून रस्त्याच्या दिशेने बाहेर पडले.  

शीना बोरा प्रकरणात देवेन भारतींनी महत्त्वाची माहिती लपवली: राकेश मारिया

यापूर्वी  मे २०१६ रोजी प्रोबेस कंपनी येथे मोठा स्फोट झाला होता. त्या स्फोटात एकुण ११ जण मृत्यूमुखी पडले होते. त्या स्फोटाच्या आवाजच्या हादऱ्यामुळे आजुबाजुच्या इमारतीच्या काचा फुटून लोक जखमी झाले होते इतकेच नव्हे तर घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मेट्रोपोलिटीन कंपनीला आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांमध्ये प्रोबेस स्फोटाच्या आठवणी जागा झाल्या होत्या. मेट्रोपोलीटीन कंपनीतून देखील स्फोटाचे आवाज येत होते. त्यामुळे मेट्रोपॉलीटीन या कंपनीला आग लागल्यानंतर मंगळवारी पुन्हा स्टार कॉलनी, गणेश नगर, संपूर्ण एमआयडीसी परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. विशेष म्हणजे येथील रहिवाशी हाताला येतील त्या वस्तू घेऊन रस्त्यावर येताना दिसत होते.