पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जोगेश्वरीतील गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

जोगेश्वरीत गोदामाला भीषण आग

मुंबईच्या जोगेश्वरी भागामध्ये गोदामाला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. गुरुवारी पहाटे अचानक गोदामाला भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

कोरोना: पुण्याच्या रुग्णालयातील भार कमी होणार, मुंबईतही यंत्रणा सज्ज

जोगेश्वरीच्या राम मंदिर रोडवरील सोमानी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या गोदामाला अचानक भीषण आग लागली होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ५ फायर इंजिन आणि ६ पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आग विझवण्यात आली आहे.  

Paytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा 'वर्क फ्रॉम होम'चा निर्णय

आग भीषण असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा येत होता. ५ तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात जवानांना यश आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीमध्ये कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. 

जाळपोळीत देशाचं भविष्य उद्धवस्त झाले : राहुल गांधी