पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवी मुंबई: डी. वाय. पाटील कॉलेजमधील इमारतीला लागलेली आग नियंत्रणात

डी वाय पाटील कॉलेजमध्ये इमारतीला आग

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेजमधील एका इमारतीला लागलेली आग नियंत्रणात 
आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. बुधावारी दुपारी अचानक डी. वाय. पाटील कॉलेजमधील मुलीच्या वस्तीगृहाच्या इमारतीला भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले. 

कोरोना: महिनाभर सभा आणि आंदोलन न करण्याचा भाजपचा निर्णय

नेरुळ येथील डी. वाय. पाटील कॉलेजमधील मुलीच्या वस्तीगृहाच्या इमारतीजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या इमारतीमध्ये थर्माकॉलचा मोठा साठा असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. कॉलेज परिसरात धुराचे लोट पसरले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कुलिंग ऑपरेश सुरु आहे. 

भीमा-कोरेगाव प्रकरण : शरद पवारांना साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले